भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन, नागपुर.

खनीजांची माहिती


ताज्या बातम्या
माहितीचा अधीकार

भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय,
महाराष्ट्र शासन, नागपूर.


नियम पुस्तिका

( माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम – 4 (1) (ब) अंतर्गत )

मुद्दा क्रमांक तपशिल

(एक) संरचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

सद्यस्थितीत भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचे संचालक, भूविज्ञान अािण खनिकर्म हे राज्यस्तरीय विभाग प्रमुख ंआहेत. संचालनालयात विविध संवर्गातंर्गत 480 पदे मंजूर आहेत.

भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाची खनिज समन्वेषण आणि खनिज प्रशासन ही दोन प्रमुख कार्ये आहेत.

खनिज समन्वेषण

खनिज समन्वेषण हे या संचालनालयाचे प्रमुख कार्य आहे. राज्यातील विशेषत: प्रमुख व गौण खनिजांचा (ग्रेनाईट इ.) शोध घेण्याकरिता प्रथमत: भूवैज्ञानिय सर्वेक्षण करण्यात येते, त्यानंतर खनिज युक्त क्षेत्रांचे सविस्तर भूवैज्ञानिय नकाशीकरण करुन तेथे आवश्यकतेनुसार खड्डे / चर तसेच आवेधनाद्वारे सच्छिद्रे घेण्यात येतात. खनिज आढळाची लांबी, रुंदी व खोली आवेधनाद्वारे ठरविण्यात येते ( ज्यायोगे सरते शेवटी खनिजाचे साठे निश्चिती करण्यात येते.) भूवैज्ञानिय नकाशीकरण करतेवेळी तसेच खनिजांचे आढळ असणा-या क्षेत्रात घेतलेले खड्डे / चर आणि आवेधनाद्वारे केलेल्या सच्छिद्रंामधुन गोळा केलेल्या खनिजांचे नमून्यांचे संचालनालयाच्या प्रयोगशाळेत रासायनिक पृथ:करण व इतर तपासण्या करुन खनिजाचा दर्जा / प्रत ठरविण्यात येते.

राज्यात खनिज पूर्वेक्षणाच्या योजना सुरु करण्यापूर्वी राज्य भूवैज्ञानिक कार्यक्रम मंडळ तसेच केंद्रिय भूवैज्ञानिय कार्यक्रम मंडळ, राज्यात भूवैज्ञानिक पूर्वेक्षणाचे काम करणारे केंद्र शासनाचे विविध विभाग व उपक्रम आणि संचालनालयाद्वारे करावयाची कामे प्रथम ठरवून घेण्यात येतात, जेणेकरुन खनिज पूर्वेक्षण कामाची एकाच क्षेत्रात पूनरावृत्ती होत नाही.

संचालनालयाद्वारे करण्यात आलेल्या पूर्वेक्षण कार्याचे फलस्वरुप राज्यात कोळसा, चुनखडक, बॉक्साईट, लोह खनिज, सिलीका वाळू, कायनाईट / सिलीमीनाईट क्रोमाईट, इलेमिनाईट इत्यादी खनिजांचे विपुल साठे सिध्द करण्यात आलेले आहेत.

खनिज पूर्वेक्षणाचे कामाकरीता राज्यात संचालनालयाची नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर व औरंगाबाद येथे प्रादेशिक कार्यालये आहेत.

फाईल उघडण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
या प्रकारच्या फाईल उघडण्यासाठी पीडीएफ रिडरची आवश्यकता आहे, पीडीएफ रिडर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा :   

माहितीच्या अधिकाराची पुर्ण पुस्तीका डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
To download complete Staff List Click Here.