भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय हे महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत आहे.
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे असून चार प्रादेशिक कार्यालये वरिष्ठ उपसंचालक / उपसंचालक यांचे अधिपत्याखाली नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर व औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.
तसेच खनिजांचे ररसायनिक विश्लेषणाकरीता नागपूर येथे रासायनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. संचालनालयात एकुण मंजूर पदे 480 आहेत.
संचालनालयाची कार्यपध्दती :-
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाची दोन प्रमुख कार्ये आहेत :-
(1) खनिज समन्वेषण
(2) खनिज प्रशासन