



अधिकाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण सत्र
राज्य प्रशिक्षण धोरण
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र
तज्ज्ञांचे व्याख्यान | ०७ ऑगस्ट २०२६
राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत आयोजित तांत्रिक प्रशिक्षण सत्राचा एक भाग म्हणून, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र यांनी 'पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) आणि शाश्वत खाणकाम' या विषयावर श्री. शांतनू उषा पद्माकर पुराणिक (संचालक, मेसर्स सृष्टी सेवा प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर) यांचे तज्ज्ञ व्याख्यान आयोजित केले होते.
'इंडियन ब्युरो ऑफ माइन्स' (IBM) द्वारे मान्यताप्राप्त RQP आणि अनुभवी पर्यावरण सल्लागार असलेल्या श्री. पुराणिक यांनी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पर्यावरणीय नियम, EIA आणि शाश्वत खाणकाम पद्धतींबाबत महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले.
Developed by CsTech - © DGM, Nagpur
Last Updated 12/08/2026, Visitor: 18695653